आपला जिल्हा

तळोदा तालुक्यात आरोग्य विभागाची आढावा बैठक: डॉ. दिनेश वळवी यांचे मार्गदर्शन.

तळोदा तालुक्यात आरोग्य विभागाची आढावा बैठक: डॉ. दिनेश वळवी यांचे मार्गदर्शन.

तळोदा : ३० ऑगस्ट २०२५:

तळोदा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रे ते उपकेंद्रांपर्यंतच्या विविध सेवा आणि त्यांच्या कामकाजाची सखोल तपासणी करण्यात आली.

बैठकीतील प्रमुख सूचना आणि निर्देश:
* NSV कॅम्प नियोजन: ५ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणाऱ्या NSV (Non-Scalpel Vasectomy) कॅम्पच्या नियोजनाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
* जोखमीच्या गर्भवतींची अद्ययावत यादी: जुलै २०२५ अखेरपर्यंतची जोखमीच्या गर्भवतींची ‘ड्यू लिस्ट’ (deu list) अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले.
* स्वच्छता मोहीम: प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात नियमित स्वच्छता राखण्याचे सक्त आदेश डॉ. वळवी यांनी दिले.
* मानव विकास लाभार्थी यादी: एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील मानव विकास लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले.
मातृ व बाल आरोग्य सेवेवर विशेष लक्ष:
या बैठकीत मातृ व बाल आरोग्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. यात १२ आठवड्यांच्या आत गर्भवतींची नोंदणी, संस्थात्मक प्रसूतीसाठी भेटी व नियोजन, नवजात बालकांच्या नोंदणी व दाखल्यांचे व्यवस्थापन, तसेच ‘मिशन ८४’ अंतर्गत मातृ व बाल मृत्यू टाळण्यासाठी गृहभेटींद्वारे जनजागृती करण्यावर चर्चा झाली. SAM (Severe Acute Malnutrition) बालके, कमी वजनाची बालके आणि अति जोखमीच्या माता यांच्याशी थेट संपर्क साधून NRC (Nutritional Rehabilitation Centre), CTC (Community Treatment Centre), VCDC (Village Child Development Centre) मध्ये SAM बालकांना संदर्भित करून दाखल करण्यावर भर देण्यात आला. संपर्कतुटलेल्या भागातील गरोदर माता व बालकांसाठी विशेष भेटी व योजनाबद्ध काम करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

सिकलसेल आणि टीबी संबंधित उपक्रम:सिकलसेल आणि टीबी (क्षयरोग) संबंधित उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये Hydroxyurea उपचार सुरू करण्यासाठी तपासणी व भेटी, नवजात तपासणी (New Born Screening) साठी NBS माहिती संकलन, आणि जुलै ते डिसेंबर २०२५ पर्यंत ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत’ अभियान व्यापक स्तरावर राबवण्यावर भर देण्यात आला. कुष्ठरोग, साथ, कीटकजन्य रोग आणि अतिसार सर्वेक्षण याबाबतही सूचना देण्यात आल्या.
डिजिटल आणि प्रयोगशाळा व्यवस्थापन:
डिजिटल प्रणाली आणि प्रयोगशाळा व्यवस्थापनात सुधारणा करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले. RCH पोर्टल (Reproductive and Child Health Portal) वेळेवर अद्ययावत करणे, E-सूची आणि S/P/L फॉर्म माहितीचे योग्य व्यवस्थापन, तसेच पाणी, मीठ, TCL (Total Chlorine), रक्त आणि Sputum (थुंकी) नमुन्यांचे नियमित संकलन करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
उपस्थित मान्यवर:
या बैठकीला तालुक्यातील सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य सेविका आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सखोल आढावा बैठकीचा उद्देश संपूर्ण तालुका स्तरावरील आरोग्य सेवा अधिक सुदृढ आणि नागरिकाभिमुख करणे हा होता. डॉ. वळवी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शन करत प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा राबवण्याचे निर्देश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!