आमदार चंदकांत रघुवंशी यांच्या बदनामी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल.
आमदार चंदकांत रघुवंशी यांच्या बदनामी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि आमदार चंदकांत रघुवंशी यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी शहादा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार रघुवंशी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांनी हे कृत्य केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
आमदार रघुवंशी यांच्या जाहीर सत्कार समारंभात केलेल्या भाषणाचा विपर्यास करून, समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारे पोस्ट सोशल मीडियावर पसरवण्यात आली आहे. या पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शहादा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
यावेळी जिल्हा उपप्रमुख डॉ. राजेंद्र पेंढारकर, सुपडू खेडकर, हिरालाल अहिरे, लोटन धोबी, संतोष वाल्हे, यशवंत चौधरी, मनलेश जायसवाल, सागर चौधरी, मुकेश चौधरी, राजरत्न बिरारे, शुभम कुवर, तुकाराम भोई, प्रवीण सैदाणे, नितीन चौधरी, दीपक महिरे, प्रवीण बोरदे, शशिकांत बिरारे, रोहित बिरारे, दिगंबर भंडारे, गुलाब सुतार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.